आपल्यामध्ये व सर्व सजीवांमध्ये बरे होण्याची प्रक्रिया अंतर्भूत असते. जीवाणूंचा प्रतिजैविकांना प्रतिसाद मिळाला नाही,तर आपण नाराज होतो;पण आपल्यामध्ये आजाराला प्रतिसाद देण्याची क्षमता नाही, याची आपल्याला खंत वाटत नाही.एखाद्या गोष्टीची माहिती झाल्याने कुणामध्ये बदल होत नसतो.प्रेरणा मिळाल्याने बदल होतो. तुमच्या जगण्यासाठी निमित्त शोधा.त्यातूनच प्रेरणा घ्या व परिवर्तन घडू द्या. तुमच्यामध्ये बदल घडवू शकणारी एक फारच छोटीशी गोष्ट मला सापडली आहे. ती छोटीशी गोष्ट म्हणजे आपण नाशवंत आहोत आणिएक ना एक दिवस मरणार आहोत. त्यामुळे मरण टाळण्यासाठी काही करू नका, तर जीवनाचा स्तर उंचाविण्याचा निश्चित प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा वाढलेला काळ बघून तुम्हीच चकित व्हाल!
please login to review product
no review added