फ्रान्समधील तुलुझ लोत्रेक या प्रख्यात घराण्यात जन्मलेला हेन्री ऐन शैशवाच्या उंबरठ्यावर एका विचित्र आजाराची शिकार होतो.त्यामुळे त्याच्या कमरेखालील शरिराची वाढ खुंटते.लोत्रेक घराण्याचा वंशाचा दिवा असलेल्या ज्या हेनरीचे तारुण्य एरवी घोडदौड,शिकार,नृत्य आणि मेजवान्या झोडण्यात व्यतीत झाले असते,तो यौवनांत प्रवेश करण्यापूर्वीच त्या मौजमस्तीला पारखा होतो.आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेल्या मुलाचे हेंगाडे रूप पाहून वडील तोंड फिरवून निघून जातात तर आई एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने आपल्या लाडक्या हेनरीच्या उशाशी बसून अश्रू गाळत बसते.अशा अवस्थेतील हेनरीची चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे ठरवतो.
please login to review product
no review added