सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रूस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं. त्याच्याजवळ काय नाही? लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी! त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही. मात्र, एका पहाटे त्याला लघवीवाटे रक्त जातं. रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात डॉक्टरांच्या भेटीसाठी आठ तास थांबावं लागतं. ह्या यशस्वी आयुष्यात जोनाथनचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालंय. युरॉलॉजिस्ट मोहम्मद खाद्रा त्याच्या संपर्कात येतात. निदान आणि उपचार ह्यांच्या भूलभुलैयात त्याला मूत्राशयाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न होतं; पण डॉ. खाद्रांच्या दृष्टीनं जोनाथन आजाराच्या मानानं तरुण असला, तरी एक सामाान्य रुग्ण राहत नाही. त्यांच्या आयुष्यातली साम्यस्थळं दिसू लागतात. डॉ. खाद्रांचं आयुष्यही एका ठरावीक वळणावर जातं. आयुष्य नश्वर आणि बेभरवशाचं असल्याचं त्यांचा आजार त्यांना शिकवून जातो. स्वत:च्या मत्र्यपणाची जाणीव झाल्यावर त्या दोघांनाही आजवर लाभलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते.
please login to review product
no review added