दक्षिण ध्रुवीय प्रदेशाबद्दलची जिज्ञासा, सन १९१२ मध्ये, अगदी शिगेला पोहोचली होती. एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या पाच देशांच्या शोधमोहिमा, त्या वेळी ज्ञात असलेल्या जगाच्या सीमा ओलांडून अज्ञाताच्या शोधामध्ये निघाल्या होत्या. रॉबर्ट फाल्कन स्कॉट ब्रिटिश मोहिमेचे नेतृत्व करत होता तर रोआल्ड आमंडसेन - नॉर्वे, डग्लस मॉसन - ऑस्ट्रेलेशिया, विल्हेल्म फिल्चनेर - जर्मनी, आणि नोबू शिरासे - - जपान या देशांच्या मोहिमांचे नेतृत्व करत होते.मार्च १९१२ मध्ये देशोदेशीच्या वर्तमानपत्रांनी आपल्या पहिल्याच पानावर 'दक्षिण ध्रुव पादाक्रांत' म्हणून घोषित केले. आमंडसेनने शर्यत जिंकली होती, परंतु वर्तमानपत्रातील पहिल्या पानावरील त्या मथळ्यामागे साहसवीरांच्या जिद्दीच्या, चिवटपणाच्या, त्यागाच्या आणि त्यांनी घेतलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांच्या अशा खूप गोष्टी होत्या, ज्यांनी त्या वेळी जनमानसाचा ठाव घेतला होता, आजपण त्या कथा स्फूर्ती देतात.ख्रिस टनीं, ध्रुवीय प्रदेशातील त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून, सन १९१२ या एका वर्षाने आपल्या ग्रहाचा शोध घेण्याच्या कालखंडाला कशी सुरुवात केली ते उलगडून सांगताहेत.
please login to review product
no review added