१९५३ची एव्हरेस्ट मोहीम हा एक सांघिक प्रयत्न होता, जॉन हंट नावाच्या असाधारण कप्तानाच्या नेतृत्वाखाली झालेला! या सांघिक प्रयत्नांचा कळसाध्याय गाठला एड हिलरी आणि तेनझिंग यांनी; पण त्याखाली असणाऱ्या इतर अनेक भक्कम खांद्यांच्या आधारावरच! पण जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे पथकातील इतर सर्व विस्मरणात गेले. अगदी आजही वृत्तपत्रे आणि शालेय पाठ्यपुस्तकांत 'हिलरी आणि तेनझिंगची एव्हरेस्टवरील चढाई' असाच मथळा आढळतो आणि इतरांचा नामोल्लेखही असत नाही. ‘कड्याच्या टोकाला लोंबणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांची अजूनही धास्ती वाटत होती; पण आशेच्या लहरींसह त्या कड्यावर मार्ग खोदत असताना मी तेनझिंगला मला दोरखंडाने घट्ट बांधून घेण्यास सांगितले. जसजसा मी वर चढत गेलो, तसतसे बर्फाचे तुकडे तिथे नसल्याचे माझ्या लक्षात आले. मोठ्या आत्मविश्वासाने मी त्या कड्यावर पाय रोवले आणि एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. मुक्ततेची भावनाच प्रथम मनात आली. मुक्तता कशापासून तर आता आणखी पायऱ्या खोदायच्या नव्हत्या, कोणतेही सुळके ओलांडायचे नव्हते, झुलवणारे उंचवटेही नव्हते. मी झटकन हात देऊन तेनझिंगला माझ्या शेजारी उभे केले...'
please login to review product
no review added