वास्तव हे कल्पिताहून अद्भूत असू शकतं, याचे दाखले जगात नेहमीच मिळत असतात. एकासारखी एक दिसणारी माणसं दुर्मीळ असतात, परंतु तशी असू शकतात. `क्लोनिंग`च्या आजच्या जमान्यात तर अशा शेकडो व्यक्ती निर्माण करता येतील, इतकी मजल विज्ञानानं गाठलेली आहे. भोवाल संन्याशाचा या शतकातील गाजलेला खटला आपल्याला आठवत असेल. एका फार मोठ्या संस्थानातील गायब झालेल्या गृहस्थ काही वर्षांनी अचानक घरी दाखल होतो. नातलगांना तो संपत्ती लाटण्यासाठी आलेला भोंदू वाटतो. कित्येक वर्ष त्याच्यावर खटला चालू राहतो... वगैरे. पेशवाईच्या काळात पानिपतच्या युद्धानंतर असाच एक तोतया सदाशिवराव भाऊ म्हणून पुण्यात हजार होतो. नाना फडणीसांच्या अक्कलहुशारीनं त्याची लबाडी उघडकीस येते. सेकंड लेडी हे तशीच एक विलक्षण कथा आहे. आपण जिच्याबरोबर संसार करतो, ती आपली पत्नी प्रत्यक्षात `दुसरीच` स्त्री आहे, असं समजलं, तर आपल्याला केवढा जबर धक्का बसेल? पण इथं तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही. त्यांचं कामजीवनही `नेहमीच्या`च परिचित `क्रीडां`प्रमाणे यात्किंचितही संशय न येता सुरळीतपणे चालू राहतं.... अशी ही नाजूक; पण गुंतागुंतीची, मती गुंग करणारी कादंबरी.... सेकंड लेडी!
please login to review product
no review added