१९ व्या व २० व्या शतकामध्ये अनेक लिखाकांच्या लेखणीतून साकार झालेले अजरामर असे साहित्य महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या काळी जनमानसावर अधिराज्य गाजवणारे हे साहित्य आज मात्र बाजारात उपलब्ध होत नाही. क्वचितच एखाद्या जुन्या ग्रंथालयामधून जीर्ण शीर्ण झालेल्या, अर्धीनिम्मी पाने गळालेल्या अवस्थेत ही पुस्तके पहायला मिळतात. अशा अनमोल साहित्याची अनुपलब्धता आणि वाचकांकडून त्याला असणारी प्रचंड मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन जुन्या काळातील अनेक अमूल्य पुस्तके ' समन्वय प्रकाशन' पुनः श्च प्रकाशित करत आहे. ही पुस्तके अनेक वर्षापूर्वीची असली तरी त्यातले अनेक सामाजिक संदर्भ आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. त्या काळच्या समस्या, समाजाची स्थिती,इतिहासाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी चित्रण करणारी हि पुस्तके आजही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात.म्हणूनच जुन्या नव्याचा 'समन्वय' साधत अनेक अजरामर आणि अमूल्य पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचा हा प्रयोग वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री बाळगत आहोत.
please login to review product
no review added