...तेवढ्यात आणखी धमाके झाले. जमीन पुन्हापुन्हा हादरत होती. मुलांच्या डोळ्यांदेखत नेम धरून फेकल्यासारखा, त्यांच्या घरावरच बॉम्ब पडला. धूळ, धुराने भरलेला आगीचा लोळ आकाशात झेपावला... परवानाने उभारलेल्या तिच्या छोट्याशा दुनियेचे जळके तुकडे चौफेर विखुरले... एकमेकांना घट्ट बिलगून भेदरलेली मुलं रात्रभर खडकांच्या आडोशाला बसून राहिली. आकाशात घरघरणारी विमानं चेकाळल्यासारखी आग ओकत होती. संपूर्ण रात्र धुमश्चक्री चालली होती. धमाके थांबले, तेव्हा सकाळ झाली असावी. समोर फक्त धुमसणारी आग... धूर... आणि धूळ... दादी नव्हती. घर नव्हतं. काहीच नव्हतं.
please login to review product
no review added