आज तो देव आहे. चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरूष होता. शोध सुरूच आहे. अशुभसूचक नाग योदध्याने त्याच्या मित्राला; बॄहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबटेहून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मॄत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्री होती. व्देषी सैतानाच्या उदयाला पुरावा सर्वत्रच आढळतो. एका जादूई अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्युपंथाला लागते. एका अनभिषिक्त राजकुमाराचा खून होतो. शिवाचे तत्त्वज्ञानविषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवांवर शिवाचा गाढ विश्वास असतो. मात्र दुष्टांचे साहाय्य घेऊन ते त्याचा विश्वसघात करतात. अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलुहासुद्धा जन्मांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या मैकामधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सूत्रधार एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टींनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की, जसे वाटत होते, तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्धे खेळली जातील. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील. शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील ’मेलुहाचे मॄत्युंजय’ हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणा-या रहस्यांचा भेद होईल. अमिश... पौर्वात्य पावलो कोएलो होण्याच्या मार्गावर उत्तम गतीने चालला आहे - बिझनेस वल्र्ड ओघवती, मनाची पकड घेणारी कथनशैली - शशी थरूर तुंबळ युद्धे आणि संघर्ष पाना-पानांवर उसळत आहेत - अनिल धारकर
please login to review product
no review added