‘धीवराची आर्त साद’ची कथा तीन कुटुंबांतील तीन मुलींभोवती फिरते. सुक्कोरिना, डॉना आणि मायोला. सुक्कोरिना गरीब, डॉना श्रीमंत आणि मायोला मध्यमवर्गीय कुटुंबातलीR. सुक्कोरिना आणि डॉनाला आई-वडिलांकडून प्रेम मिळालेलं नाही. मायोलाला ते मिळालंय, पण तिची मोठी बहीण झरेला हिच्या स्वैर वर्तनाला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेले आई-वडील आणि झरेलाने केलेली आत्महत्या यामुळे समुपदेशक असलेली मायोला अस्वस्थ आहे. सुक्कोरिनाचा विवाहित पुरुषाकडून झालेला कौमार्यभंग आणि तिने केलेला गर्भपात, याचं तिच्या वैवाहिक जीवनावर पडलेलं सावट, त्यामुळे ढळेलेलं मानसिक संतुलन, प्रेमाच्या शोधात वणवण फिरणाऱ्या डॉनाचं अयशस्वी ठरलेले दोन विवाह, त्यामुळे तीव्र निराशेने (डिप्रेशन) ग्रासलेलं मन. सुक्कोरिना, डॉना आणि मायोलाचं नाट्यमयरीत्या एकत्र येणं...तिघींच्या जीवनाचा हा प्रवास अनुभवण्याजोगा आणि मन:स्पर्शी.
please login to review product
no review added