मुंबईतील एक कफल्लक वेटर तुरुंगामध्ये का गेला आहे? कारणे आहेत : अ. त्याने गि-हाइकाला ठोसा मारला आहे. ब. त्याने खूप व्हिस्की घेतली आहे. क. त्याने गल्ल्यामधून पैसे चोरले आहेत. ड. जगातील सगळ्यांत मोठ्या रकमेचा ‘क्विझ शो’ त्याने जिंकला आहे. ‘हु विल विन ए बिलियन’ या क्विझ शोमधील बाराही प्रश्नांची उत्तरे अचूक दिल्यानंतर राम महम्मद थॉमस याला अटक करण्यात आली आहे. कधीही शाळेचे तोंडही न बघितलेला किंवा वृत्तपत्र हातातही न धरणारा एक दरिद्री, अनाथ मुलगा सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रहाचे किंवा शेक्सपिअरच्या नाटकाचे नाव लबाडी केल्याखेरीज सांगूच शकत नाही. क्विझ शोचे चित्रीकरण पुन्हा बघताना तो आपण कसे जिंकलो याचे वर्णन करू लागतो आणि वाचकाला घेऊन जातो त्याच्या आयुष्याच्या अद्भुत सफरीवर! कचराकुंडीवर सुरू झालेल्या त्याच्या आयुष्यात कधी त्याची गाठ पडते सुरक्षेचे अती वेड असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्नलशी, तर कधी तो ‘ताजमहाल’चा गाईड म्हणून काम करतो. रामची जीवनेच्छा चिवट आहे! रस्त्यावरील जीवन जगताना मिळालेल्या शहाणपणातून, क्षुल्लक गोष्टींच्या भांडारातून तो क्विझमधील प्रश्नांची उत्तरे देत लाखो प्रेक्षकांना अक्षरश: स्तंभित करतोच; पण आयुष्याच्या कोड्याचीही उत्तरे मिळवतो. आधुनिक भारताच्या सामाजिक पाश्र्वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवतेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखवते...
please login to review product
no review added