आता मी एक स्त्री-वादी कथा लिहिणार आहे- असं ठरवून कुणी कथा नाही लिहीत. आपण स्वतः, आपल जीवन, इतिहास, राजकारण अशा सगळ्याचा आपल्या अभिव्यक्तीवर परिणाम होतो. ह्या सर्वांच्या अदृश्य सीमारेषा परस्परांत मिसळून जातात. हरेक सृजनशील लेखकाच्या पाठीशी ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी एखादा निर्णय घेते, तो स्त्री-वादी विचारसरणीत बसतो कि नाही, ह्याची मी चिरफाड करत बसत नाही . कारण स्त्री-वादी विचारसरणी माझ्या जीवनापेक्षा काही वेगळी आहे, असं मला वाटत नाही. स्त्री-वादी विचार म्हणजे काय, हे कळण्यापूर्वीदेखील मी काही स्त्री-वादी निर्णय घेतले होते.
please login to review product
no review added