आजीआजोबा आणि नातवंडं यांच्यातल्या हृद्य नात्यातले अनेक लोभस पदर उलगडून दाखवणाया या सुंदर सत्यकथा! या कथा अमेरिकेतल्या असल्या तरी अगदी आपल्या वाटतात. कारण या नात्याला स्थळकाळाचं बंधन नाही. आजकालच्या जीवनपद्धतींमुळे आजीआजोबा आणि नातवंडं एकमेकांपासून कितीही दूर राहत असली तरी टेलिफोन, कॉम्प्युटर, व्हिडिओ, कॅमेरा या आधुनिक साधनांमुळे ती कायम एकमेकांच्या जवळ असतात. संस्कार करणारे, दु:खात मनाला उभारी व धीर देणारे, नातवंडांबरोबर हसणारेखेळणारे, खाऊपिऊ घालणारे आजीआजोबा ज्यांना लाभतात, ती भाग्यवान मुलं आयुष्यात पुढे जाऊन उत्तम माणूस व नागरिक बनतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्यातल्या विविध घटनांना तोंड दिलेल्या साध्यासुध्या सामान्य माणसांच्या या सत्यघटना. या कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील आणि नातवंडांच्या रूपानं केवढी मोठी देणगी परमेश्वर आपल्याला देत असतो, याची परत एकदा नव्यानं जाणीव करून देतील.
please login to review product
no review added