ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे ९/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा' हा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्षं अमेरिकेच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोधमोहिमेची ही कथा लक्षवेधी आणि थरारक ठरते! पीटर बर्गन हे बिन लादेन आणि अल्-कायदावर लिहिलेल्या 'बेस्टसेलर' पुस्तकांचे लेखक आहेत.
please login to review product
no review added