‘‘मेरीने लैलाला उचलून घेतलं आणि त्या दोघी एकमेकींच्या आलिंगनात जणू काही अनंतकाळपर्यंत विसावल्यासारख्या भासल्या....’’ मेरीला तातडीने कृती केली पाहिजे, याचं भान आलं.... लैलाचं मुटकुळं घट्ट धरून ती टॅक्सीकडे आली.... दरवाज्यापर्यंत पोहचताच मी आत उडी घेतली; ड्रायव्हरला ओरडून सांगत, ‘चल, निघ.’ ‘शेकडो ब्रिटिश स्त्रियांसाठी डोन्या-अल् नहि ही एक दयेची मूर्तिमंत देवदूतच आहे....’ ‘विश्वास बसणार नाही एवढ्या धैर्यवान अशा या डोन्याच्या आयुष्याचं इतिकर्तव्य म्हणजे मुलांच्या विरहाने दु:खी झालेल्या स्त्रियांचं त्यांच्या मुलांशी पुनर्मीलन घडवून आणणं... आणि तेही ठार मारण्याच्या धमक्यांना आणि तुरुंगात टाकलं जाण्याच्या संकटांना तोंड देत....’ ‘हृदयाचा ठोका चुकवणा-या धाडसी मोहिमा म्हणून डोन्याच्या गोष्टी जेवढ्या परिणामकारक आहेत, तेवढ्याच सांस्कृतिक भिन्नता असलेल्या लोकांनी विवाहबद्ध झाल्यावर काय चुकत जातं, त्याचंही त्या परिणामकारक चित्रण करतात....’
please login to review product
no review added