लहानपणी दृष्टिपटलाला झालेल्या आजारामुळे सॅब्रिए टेनबर्केन अंध होते, मात्र स्वत:ला वचन देते की, ‘आपले अंधत्व कधीही अपंगत्व ठरणार नाही, किंबहुना आपण तसे घडू द्यायचे नाही!’ चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिबेटमधील अंध मुलांची दारुण स्थिती सॅब्रिएला समजल्यावर तिला धक्काच बसतो! ती निर्णय घेते – नाकारलेल्या, धिक्कारलेल्या आणि हीन दर्जाची वागणूक मिळणा-या तिबेटमधल्या अंध मुलांना मदत करण्याचा! निष्ठा आणि निर्धार एवढ्याच पुंजीवर ती एकहाती तिबेटी भाषेत ब्रेल बाराखडी तयार करते... अगदी मोजक्या मुलांसह ल्हासात अंधांसाठी पहिली शाळा उघडते... अर्थातच तिला यासाठी असंख्य समस्यांवर धैर्याने मात करावी लागते... आणि एका छोट्या प्रयत्नापासून सुरू झालेल्या या प्रयोगरूपी बीजाचे सर्व वयोगटातील अंधांसाठी काम करणा-या एका भव्य संस्थारूपी वटवृक्षात रूपांतर होते.... काळोखाचे जग उजळून टाकणा-या सॅब्रिएची ही तेजोमय कहाणी!
please login to review product
no review added