‘‘प्रेसिडेंट प्रेमच्या मृत्यूला कारणीभूत कोण असावं याची मला साधारण कल्पना आली आहे,’’ ब्लेक म्हणाला. ‘‘कोण?’’ ‘‘तुझा नवरा. अॅलिस, एका अर्थी तोच या घटनेला जबाबदार आहे.’’ अॅलिसला बसलेला धक्का जबरदस्तच होता. ‘‘ते अशक्य आहे.’’ ‘‘आधी माझं बोलणं तर ऐकून घे; मग काय ते ठरव.’’ ‘‘मॅट?’’ ती म्हणाली, ‘‘हे असं कुणाचा खून वगैरे करवण्याचं काम मॅटचं शक्यच नाही. तू प्लीज मला काय ते सगळं सांग.’’ ‘‘मग ऐक तर,’’ ब्लेक म्हणाला. ‘‘प्रेम सँगची अमेरिकेला लाम्पांगमधे लष्करी विमानतळ द्यायला अजिबात तयारी नव्हती. त्याला कम्युनिस्ट चळवळीच्या नेत्यांशी समझोता घडवून आणून कम्युनिस्ट चळवळीला राजकीय पक्षाचा दर्जा देण्याची इच्छा होती. आणि हे धोरण अमेरिकेच्या विरुद्ध होतं हे तुझ्या लक्षात आलंच असेल.’’ ‘‘हो. मला कल्पना आहे त्याची.’’ ‘‘त्यामुळेच सी. आय. ए.तल्याच कुणाच्यातरी डोक्यात असा विचार आला की या प्रेमची खुर्ची जर काही कारणाने खाली करता आली, तर त्याची जागा त्याची पत्नी नॉय घेईल. आणि ती एक अबला असल्याने जनरलनाकॉर्नला याचा फायदा उठवता येईल. पर्यायाने अमेरिकेचा फायदा होईल.’’
please login to review product
no review added