अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामथ्र्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरश: उलथापालथ घडवू शकते. त्यातून मग ह्या दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघांत युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की.चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल, अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे का की, त्या मागे काही मूलभूत कारणे आहेत? जगाला भेडसावणा-या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत, मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला, तर हितसंबंधाचा संघर्ष अटळ आहे.थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणारी कादंबरी.
please login to review product
no review added