एफबीआयसाठी स्पेशल एजंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून एक खून करणा-या खुन्यांचा माग काढण्यात तरबेज होती; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला ठार मारून तिच्या चेह-याबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केली. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगळं संपलं होतं.... आता काय करेल स्मोकी? रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगळं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणा-या, बुद्धिमान पण विकृत मनोवृत्तीच्या ‘त्या सावली’चा शोध घेऊन छडा लावेल? रहस्यमय घटनांची गुंफण असलेली चित्तथरारक कादंबरी!
please login to review product
no review added