‘फोर्ट जॅक्सन’ या मिलिटरीच्या तुरुंगात ‘रूफस हाम्र्स’ हा कैदी एका लहान मुलीच्या हत्येच्या आरोपावरून गेली पंचवीस वर्षं आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. स्मरणशक्ती गमावलेल्या रूफसला फक्त ‘त्या’ प्रसंगाची स्मृती होती. त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या एका पत्राने त्याच्या विस्मरणशक्तीला हादरा बसला आणि त्याला चक्क ‘सर्व’ आठवायला लागलं. त्यानं सुप्रीम कोर्टाला त्याच्या वकिलामार्फत एक अपील केलं. ते कोर्टापर्यंत पोहोचलंच नाही. ते अपील पाहिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या मायकेल फिस्क या क्लार्कचा खून झाला. त्यानंतर आणखी एका क्लार्कचा खून, त्याच्या वकिलाचा–त्याच्या बायकोचा खून अशी खुनांची मालिका सुरू झाली. आपल्याला ‘न्याय’ मिळावा म्हणून केलेल्या रूफसच्या न पोहोचलेल्या अपिलावर सुप्रीम कोर्ट कसा निर्णय घेणार? मिलिटरीत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का? मायकेल फिस्कच्या भावाचा – जॉन फिस्कचा आणि मायकेलची सहकारी सारा इव्हान्स हिचा या प्रकरणात काय संबंध आहे? मिलिटरीच्या ज्या पत्रामुळे या प्रकरणाची सुरुवात झाली त्या पत्रात ‘विशेष’ असं काय होतं? कायद्यापुढे सर्व समान असतात. छोट-मोठे, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे असा भेद करणं, प्रघात आहे म्हणून काहीही मान्य करणं, हे कर्तव्यदक्ष न्यायाधीश एलिझाबेथ नाइट यांना मान्य नव्हतं. सत्य उजेडात आलंच पाहिजे. कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येतं ते असतं निखळ सत्य! असं त्यांचं मत होतं. ‘द सिम्पल ट्रूथ!’ राजकीय-सामाजिक जाणिवेतून मानवी मनाचा शोध घेणारी, मनाला स्पर्श करणारी अशी ही कादंबरी.
please login to review product
no review added