वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारे जगाला पटवण्यासाठी एन.ई.आर.एफ. या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. एन.ई.आर.एफ.कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे समर्थक दहशतवादी पॅसेफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
please login to review product
no review added