• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

The Gift Of Rain (द गिफ्ट ऑफ़ रेन )

  Mehta Publishing House

 441

 978-81-8498-245-9

 ₹440

 Paper Back

 435 Gm

 1

 1


पेनांग १९३९. सोळा वर्षांचा फिलिप हटन हा एकलकोंडा तरुण. अर्धा इंग्रज, अर्धा चिनी; पण स्वत:ला दोन्ही न समजणारा. हयातो एंडो या जपानी अधिका-याशी झालेल्या अनपेक्षित मैत्रीमध्ये स्वत्व सापडलेला. फिलिप त्याच्या नव्या मित्राला त्याचे आवडते पेनांग बेट दाखवतो आणि त्या बदल्यात एंडो त्याला आयकिडोचे शास्त्र व कला शिकवतो. पण या शिक्षणासाठी भयंकर मोल मोजावे लागते. गूढ व्यक्तिमत्त्वाचा एंडो स्वत:च्या शिस्तीने बांधलेला असतो आणि जेव्हा जपानने मलायावर केलेल्या चढाईत फिलिपचे कुटुंब आणि त्याचे प्रेम असलेले सर्वकाही धुळीला मिळत असते, तेव्हा आपण ज्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि ज्यांच्याशी आपण पूर्णपणे एकनिष्ठ राहिलो त्या आपल्या सेन्सायचे – गुरुंचे – एक भयानक गुपित आहे याची त्याला जाणीव होते. आपल्यामुळे ज्यांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांना आपण काहीही करून वाचवले पाहिजे, तसेच एंडो खरा कोण व काय आहे याचा छडा लावला पाहिजे असे त्याला तीव्रपणे वाटते. पावसाने वरचेवर धुतले जाणारे समुद्रकिनारे, डोंगरावरील गूढ मंदिरे, मसाल्याचा वास भरलेली गोदामे, ऐश्वर्यशाली बॉल रूम्स आणि दलदलीने भरलेली पर्जन्यारण्ये यांनी युक्त अशी आकर्षक दृश्ये, तसेच आवाज आणि गंध यांचा कौशल्याने वापर करून तान त्वान एंग यांनी दगाबाजी, पाशवी क्रौर्य, निधडे शौर्य व चिरंतन प्रेम यांनी मनाला चटका लावणा-या अशा या कहाणीची निर्मिती केली आहे. -- ‘लक्ष खिळवून ठेवणारी कथा! अतिशय आल्हाददायक असा भावनापूर्ण प्रवास. दुसऱ्या महायुद्धाच्या आघातातून बाहेर येणा-या आग्नेय आशियाचे सुंदर चित्रण. अवश्य वाचावे.’ – जॉन मॅकरी, रुटलेज गाईड टू मॉडर्न रायटिंगचे लेखक. ‘ चैतन्याने ओथंबलेले अतिशय सुंदर पुस्तक! त्या घटनेनंतर साठ वर्षांनीसुद्धा दुसऱ्या महायुद्धातील मलायातील जपानी किंवा ब्रिटिश लोकांची अनुभूती समजू न शकलेल्या ब्रिटिशांसाठी अनिवार्य असावे असे.’ – मायकेल अ‍ॅशकेनाझी ‘सर्व मलेशियनांना अभिमान वाटेल असे पुस्तक!’ – एरिक फोब्र्स गुड बुक गाईड.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update