शरीरात परक्या पदार्थाचा प्रवेश झाला तर त्याला कडाडून विरोध करायचा, हे याचं कार्य असतं. अडचण अशी होती, की एम्एच्सी हा क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागातील फारच छोटा भाग होता. त्यामध्ये आम्लारींच्या लक्षावधी जोड्या असलेल्या कितीतरी रिकाम्या जागा होत्या. या जागांमध्ये इतर शेकडो जनुवंÂ होती. या जनुकांचं कार्य काय आहे, ते केविनला अजिबात ठाऊक नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी त्यानं अलीकडेच इंटरनेटवर चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला मिळालेली उत्तरं फारच मोघम आणि असमाधानकारक होती. बNयाच संशोधकांचं म्हणणं असं होतं, की क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागामध्ये स्नायू आणि हाडांच्या वाढीशी संबंधित अशी जनुवंÂ आहेत. पण यापलीकडे आणखी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.
please login to review product
no review added