व्हर्जिन मदर मेरीचे अवशेष ज्या ऑसुअरीत आहेत त्याचा ठावाठिकाणा सांगणारे पत्र एका चलाख पुरातत्त्वज्ञाच्या हाती पडते. त्या ठिकाणी पूर्वी पुरातत्त्व संशोधक म्हणून काम केले असल्याचा फायदा घेऊन त्याच्या रेणुजीवशास्त्रज्ञ असलेल्या तरुण बायकोच्या मदतीने ती ऑसुअरी त्या दुर्गम जागेतून बाहेर काढण्यात तो यशस्वी होतो. तेथून सुरक्षितपणे सुसज्ज अशा प्रयोगशाळेपर्यंत त्या ऑसुअरीचा प्रवास त्याच्या आर्चबिशप असलेल्या मित्राच्या नावाचा (पण त्याच्या नकळत) फायदा घेऊन करण्यात यशस्वी होतो. हे कथानक न्यूयॉर्क शहरातील फोरेन्सिक लॅबमध्ये काम करणाऱ्या जॅकच्या कहाणीपासून सुरू होतं, पण समांतररीत्या त्याच वेळेस इजिप्तमधील कैरो इथं त्याच कथानकाची अन्य कडी गुंफली जात असते शॉन या पुरातत्त्वज्ञाच्या कहाणी बरोबर. हे दोघंही कॉलेज काळातील जिगरी दोस्त आहेत. त्यांच्या या ग्रुपमधील तिसरा मित्र जेम्स हा आता आर्च बिशप असून त्याचाही यात समावेश होतो आणि ही कहाणी कोणते वळण घेते, ते मती गुंग करणारे आहे.
please login to review product
no review added