"’योशिको कावाशिमा’ अर्थात मंचुरियाची ’आयसिन गिओरो’ आणि राजकुमार स्यू यांची मुलगी; कोणी तिला ’जपानी पियुनी’ या नावानेही ओळखत असत. योशिकोचे वैवाहिक (!) जीवन किंबहुना तिचे सारे आयुष्यच जपानी पियुनी या फुलासारखे रंगीत आणि त्याच्या दुहेरी गच्च पाकळ्यांप्रमाणे साहसी आणि संकटांनी भरलेले होते. लहानपणापासूनच राजकन्या योशिको बंडखोर आणि संशयी वृत्तीची, स्वतंत्र (खरेतर स्वैर) विचारांची होती. पुढे तरुणपणी ती जपानची गुप्तहेर बनली; आपले इप्सित साध्य होण्यासाठी ’वाट्टेल ते’ करण्यास ती तयार असे. कारस्थाने, लबाडी, खोटेपणा यावर तिचा अधिक भर असल्याने आपोआप ती दोन परस्परविरोधी देशांच्या जाळ्यात अडकली आणि तिची तुरुंगात रवानगी झाली. तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अर्थात त्यातूनही तिने आपली सुटका करून घेतली आणि पुढे ती सुमारे 39 वर्षे जगली; मात्र योशिकोचा तुरुंगातून पळाल्यानंतरचा जीवनप्रवास अज्ञातच राहिला. "
please login to review product
no review added