दुस-या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता. पुढच्या तीन महिन्यांच्या जपानच्या आक्रमणाची लष्करी गुपिते असलेली कागदपत्रे घेऊन एक हेर पळून जात होता. तर बहुमोल किंमतीचे हिरेही या धामधुमीत हलवले जात होते. शेवटी यातून बॉम्बिंग, जाळपोळ निर्माण होत गेली. त्या थरारक पाठलागात एक दोन वर्षांचे अनाथ पोर सापडले. आठवडाभर पाण्यावरून हालअपेष्टा सहन करीत किनारा गाठला. पण विमाने, पाणबुडी, सैन्य हात धुऊन मागे लागले. या लष्करी धामधुमीत एक मूक प्रेमकथा फुलत होती. मानवी शरीराची व मनाची कमाल क्षमता ताणली जात होती. शेवटी काय झाले?
please login to review product
no review added