पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला. दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं त्याला कुलूप नव्हतं! दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे नजर टाकली. त्या दारापलिकडे खाली उतरत जाणारा एक जिना त्याला दिसला. आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी येऊन पोहोचलो आहोत असंच त्याला प्रथम वाटलं पण – दुस-याच क्षणी त्याचं तोंड आश्चर्यानं वासलं गेलं! त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा एक फ्युरर बंकर दिसला! आणि – आपल्याला काय आढळलंय याची त्याला अकस्मात् जाणीव झाली! ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत जिवाचं रान केलं होतं तोच हा – जगाला अज्ञात असलेला हिटलरचा सातवा गुप्त बंकर होता! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी!
please login to review product
no review added