ग्वांटानामो बे मधील छावण्यांमध्ये जे नऊ ब्रिटिश नागरिक डांबले गेले होते, त्यापैकी मोआझ्झम बेग हे एक होते. जो गुन्हा त्यांनी केलाच नव्हता आणि ज्या गुन्ह्यांचं नेमकं स्वरूप कधीही स्पष्ट झालं नाही, त्यासाठी त्यांना तिथे डांबून ठेवण्यात आलं. ९/११च्या हल्ल्यानंतर जे एक वातावरण तयार झालं, त्या काळात पाकिस्तानमधे तात्पुरतं बि-हाड करून ते राहात असताना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आलं. मोआझ्झम बेग तीन वर्षं तुरुंगात राहिले. यातला बराच मोठा काळ एकांतवासात गेला. तिथे डांबलेल्या दोघांचा खून पडताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्या घटनेने आणि त्यामुळे त्यांना मृत्यूच्या धमक्या दिल्या गेल्या तसंच भयंकर छळालाही सामोरं जावं लागलं. २००५ साली सुरुवातीला त्यांना कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण वगैरे न देता किंवा त्यांची माफी न मागता त्यांची सुटका करण्यात आली.
please login to review product
no review added