सहा शॉट्स. पाच ठार. काही तासांत बिनतोड पुराव्याच्या आधारावर गुन्हेगाराला अटक, पण तो तोंडातून अक्षर काढत नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर तो बोलतो, `तुम्ही चुकीच्या माणसाला पकडले आहे... माझ्यासाठी जॅक रीचरला बोलवा.` जॅक रीचरचा इतरांना शोध घेता येत नसला तरी टी.व्ही.वरच्या बातम्या बघून तो यायला निघालेलाच असतो. त्याची खात्री असते की काही तरी घोटाळा आहे. गुन्हेगार लष्करातला नेमबाज असताना एक शॉट चुकलाच कसा? आणि शहरात पोहोचल्यावर रीचरच्या लक्षात येते की त्याचे या शहरातले अस्तित्व कुणाला तरी खुपते आहे. रीचर तेरा वर्षे मिलिटरी पोलीस असतो. तपास करण्यात, माग काढण्यात तरबेज. त्याला भानगडीत अडकवण्यासाठी निरपराध व्यक्तीचा खून करण्यापर्यंत मजल गेल्यावर, संतापलेला रीचर बचाव पक्षाच्या तरुण आणि सुंदर अशा वकिलाला घेऊन त्यांच्यामागे लागतो. त्याला माहीत असते की खरा गुन्हेगार शोधायचा तर तेवढेच कावेबाज आणि निर्दय व्हायला हवे. प्रत्येक पावलाला गोळीचे उत्तर गोळीनेच द्यायला हवे.
please login to review product
no review added