मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्ताहिकांपैकीच एक ‘द फोर्ड कौंटी टाइम्स’ हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असलं तरीही सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, कॉलेज सोडलेला एक तेवीस वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिद्ध करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो. मिसिसिपी, क्लॅन्टनमधल्या भरगच्च कोर्टात खुनी डॅनी पॅडगिटवर खटला उभा राहतो. धक्कादायक, पण खटल्याला नाट्यपूर्ण कलाटणी देणारी गोष्ट घडते. तो ज्यूरर्सना उघड धमकी देतो की, त्याला दोषी ठरवण्यात आलं, तर तो एकेकाचा सूड घेईल. तरीही त्याला दोषी ठरवण्यात येते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. पण मिसिसिपीमध्ये १९७०च्या काळी जन्मठेप म्हणजे सारा जन्म तुरुंगात काढणं असं नव्हतं. नऊ वर्षानंतर डॅनी पॅडगिट पॅरोलवर सुटतो, फोर्ड कौंटीमध्ये परत येतो आणि शेवटी, केलेल्या अपराधांमुळे परमेश्वरी न्यायाचा बळी ठरतो.
please login to review product
no review added