बन्र्ड अलाइव्ह ही सुआद नावाच्या पॅलोस्टिनी तरुणीची कहाणी आहे. एखाद्या मुलाकडे नुसतं पाहिलं किंवा त्याच्याशी बोललं म्हणून नावं ठेवणा-या संकुचित आणि पुरोगामी पॅलोस्टिनी समाजात एक तरुण सुआदला लग्नाचं वचन देऊन फसवतो. याची कठोर शिक्षा सुआदला मिळते आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळासह तिला जिवंत पेटवून दिलं जातं. ऑनर क्राइमच्या या क्रूर अनुभवातून सुआद वाचते. समाजसेवी संघटनेच्या एका कार्यकर्तीमुळे सुआदला जीवनदान मिळतं आणि युरोपात तिचं नवं आयुष्य सुरू होतं. बालपणी सोसलेला कमालीचा छळ, गुरासारखा खाल्लेला मार, मरेस्तोवर केलेलं काम आणि दुसरीकडे, युरोपातल्या पुढारलेल्या समाजातलं जीवन, आगीच्या खाणाखुणा अंगावर वागवत जिणं, नवरा-मुलांकडून प्रेम, मानसिक आधार मिळालेली सुआद डोंगराएवढं धाडस करून तिची कथा सगळ्या जगासमोर मांडते. तिच्यासारखा प्रसंग ओढवलेल्या मुलींना धीर देण्याचा प्रयत्न करते. हा तिचा प्रवास काळजाला घरं पाडणारा, त्रासदायक आहे पण त्याला धैर्याची, माणुसकीची, इच्छाशक्तीची, सहनशक्तीची प्रेरक झालरही आहे.
please login to review product
no review added