‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ ...मृत्यू ...अटळ सत्य... धडकी भरवणारं, वाईट, खिन्न मानलं जाणारं वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम... पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात.
please login to review product
no review added