बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलीनं, सर्वांचा विरोध झुगारून,एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानशा गावात ती मोठ्या विश्वासानं गेली.पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे. पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणसं वाईट नव्हती; पण काही लबाड,स्वार्थी माणसांमुळे तिला तिथं बंदी होऊन राहावं लागलं. आठ वर्षांच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव,तिथलं साकळलेलं जीवन आणि तालिबानसारख्या धर्मांधांबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची ही कहाणी.तिच्या जीवनाची ही करुण कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
please login to review product
no review added