रथचक्र ही आपली सर्वात यशस्वी कादंबरी आहे, असे स्वतः लेखक श्री. ना. पेंडसे सांगतात. त्यावरूनचं लेखनाची थोरवी समजते. पेंडसे यांनी ही कादंबरी एका वेगळ्या तंत्राने हाताळली आहे. मराठी कादंबरीच्या विकासाने १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या 'रथचक्र'ने एक नाव टप्पा गाठला असल्याचे प्रशंसा समिक्षकांकडून त्यावेळी करण्यात आली होती. यातील कृष्णाबाई सारखी काही पात्रे वास्तवातून आली आहेत. नायिकेच्या नियतीशी चाललेला मुकाबला हे कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाच भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीचे सूत्र आहे असे पेंडसे यांनी नमूद केले आहे.
please login to review product
no review added