साधारण शंभर वर्षांपूर्वी उमरावजान ही कथा प्रकाशात आली. लखनौची ही कलावती आकर्षक, नावाजलेली नर्तिका आणि कवयित्री होती. अदा हे तिचं उपनाव होतं. तिची शेरोशायरी ऐकून अनेक वस्ताद आणि अमीर उमराव वाहवा, वाहवा करीत रंगून जात ! तितकीच उच्च श्रेणीची ती नृत्यांगनाही होती. या गुणवान स्त्रीला जीवनात किती संकटांना सामोरं जात गावोगाव फिरावं लागलं याचं आश्चर्य वाटतं. या भटकंतीच्या वर्णनामुळे आपल्याला समकालीन लखनौचं, तिथल्या नबाबजाद्यांच्या श्रीमंती आणि रंगेल राहणीसह त्यांच्या महालांचे दर्शन होतं. उडाणटप्पू आणि हिडीस वस्तींची सुखासीन राहणी याचाही उबग येतो ! ती संस्कृती आणि जीवनपद्धती आता नामशेष झाली आहे. उमरावजानच्या दुःखमय जीवनाचं दर्शन मिर्झा हादी रुसवा यांनी मार्मिकपणे केलेलं आहे. ही अभिजात कादंबरी अनेक भाषांत आणि चित्रपटाच्या दृश्य माध्यमातूनही प्रसिद्ध झाली आहे. मराठी भाषेत ती ग्रंथरूपाने प्रथमच प्रसिद्ध होत आहे.
please login to review product
no review added