• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Sarsenapati Yesaji kank ( सरसेनापती येसाजी कंक )

  Chetak Books

 200

 978-81-19573-96-7

 ₹400

 Paper Back

 

 1

 1


राजे, तुम्ही गडशिखरावरचे शिखराधिपती आणि आम्ही तर गडपायरीचे दास. आपल्या पायाच्या पवित्र धुळीनं पावन झालेली गडपायरी म्हणजे आमची जिंदगी. राजे, मराठ्यांची जात ही रांगडी अन् तगडी असते म्हणूनच ती रणमैदानी भेकडासारखी लंगडी खेळत नाही. राजे, कर्म आणि धर्माला एकच मानून आग्या मोहोळ पाठीवर घेऊन, इंगळाचं बाशिंग बांधून गनिमाला रणमैदानी धूळ चारणं, चीतपट करणं हेच येसाजीला ठाऊक आहे. राजे, गनिमाला तलवारीच्या टोकावर नाचविलं की तो मग टोकाचं पाऊल उचलित नाही. राजे, रणमैदानातल्या अंगावरच्या जखमा म्हणजे शूरवीराचं खरं भूषण, आभूषण. या अंगावरच्या जखमा म्हणजे शूरवीराला खरा रणतुरा वाटतो. राजे, उफाणलेल्या, उसळलेल्या दर्याला आणि भणाणलेल्या वादळाला काबूत ठेवण्याचं तंत्र आम्ही आपल्याकडूनच शिकलोय. तेव्हा गनीम कितीही अंगावर चालून आला तरी हा येसाजी अजिबात गोंधळत नाही की घाबरत नाही. राजे, राजाच्या डोळ्यात पाणी नसावं तर त्यांच्या तलवारीत पाणी असावं हेच आम्ही आपल्याकडून शिकलोय. तेव्हा तुमच्या डोळ्यांत पाणी नसावं, ही सगळी दुनिया आपल्या पायाशी उभी करू. राजे, धीरालाही धीर देणारे तुम्ही धैर्यवान, धैर्यशील. तुफानालाही सहजी कवेत घेऊन त्याचा भूगा.. भूगा करणारे तुमचे शक्तिशाली बाहू आणि गनिमाला मरणाची मसणवाट दाखविणारी तुमची मगरमिठी. आणि इतरही बरेच काही !

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update