शतकानुशतकापासून असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत.जगन्नाथ केशव कुंटे हा असाच एक परिक्रमावासी. पण तो केवळ ’धार्मिक-आध्यात्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नाही, तर पूर्वकल्पनांची पुटं मनावर न ठेवता, मोकळया मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. देश-विदेशात पत्रकार म्हणून आलेल्या अनुभवाचं संचित, सामाजिक भान आणि आध्यात्मिक जाण ही त्यांची शिदोरी. म्हणूनच त्यांचं अनुभवणं एकसुरी नाही, बहुमिती लाभलेलं आहे. त्यामुळेच मेधा पाटकरांच्या कामाबद्दल ते तळमळीनं लिहितात... साधुत्वाच्या नावाखाली चाललेल्या बुवाबाजीवर कोरडे ओढतात. आणि त्याच वेळी ’चमत्कार’ वाटावा असे अनुभवही सहजतेनं सांगतात. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे कथन, म्हणूनच नर्मदापरिक्रमेवरील लेखन विलक्षण रंगत आणि वेगळेपण घेऊन आलं आहे.
please login to review product
no review added