* मधुमेह आणि उच्च रक्तदाब रोखण्यासाठी उपयुक्त अशा व्यवहार्य सूचना. * या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावाच्या कारणांची सविस्तर चर्चा. * सदोष मनोवृत्तीमुळेही उच्च रक्तदाब कसा उद्भवू शकतो याचे प्रथमच विवेचन. * बऱ्याच वेळा केवळ आहाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते अशा प्रकारच्या आहाराबद्दलची संपूर्ण माहिती. * मधुमेह होऊ नये यासाठी आदर्श व्यायामपद्धती. * मधुमेहात वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांची क्रमवार माहिती. या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःच तुमच्या लघवीची तपासणी करू शकता आणि खर्च वाचू शकता. * मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासाठी वापरण्यात येणारी औषधे, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे संभाव्य दुष्परिणाम याविषयी सविस्तर चर्चा. * इन्सुलिनचे इंजेक्शन स्वतःच घेण्याच्या पद्धती विषयी सचित्र आणि व्यवहारिक माहिती. या माहितीमुळे तुम्ही याबाबतीत स्वावलंबी व्हाल. * कातडीची आणि पायांची काळजी कशी घ्यावी याविषयी सचित्र आणि व्यवहार्य माहिती. * उंचीनुसार आदर्श वजन, विविध खाद्यपदार्थांमध्ये असलेले पोषक घटक, विविध जीवनसत्वे आणि खनिजद्वार यांची प्राप्ती स्थानी याबद्दलची खूपच उपयोगी परिशिष्टे. स्वतःच्या आणि प्रियजनांच्या आरोग्याची काळजी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक उत्कृष्ट आणि अनिवार्य पुस्तक.
please login to review product
no review added