घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातल अव्यक्त ते व्यक्त होऊ लागल... पूर्व म्हणाली, ` केवळ काटकोनात आपल्याला उभं केलय म्हणून आपल्याला भित म्हणतात. आपली माती एकच आहे. अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही. आपण कुणाचाही विभाजन करत नाही. माणसांनी त्यांच्या सोईसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत. माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या. अहंकाराच्या विटांवर नम्रतेच, निगर्वीपणाच प्लास्टर. पक्क बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. आणि हे दर्शविण्यासाठी सोहळे!` पश्चिम म्हणाली, `मला माणसामाणसातले हे व्यवहार कळत नाहीत. अहंकार नात्यानात्यात गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याच काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे मानस आर्किटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतींचे अश्रू ` !
please login to review product
no review added