• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Kunastav Kunitari (कुणास्तव कुणीतरी)

  Rajhans Prakashan

 299

 81-7434-183-8

 ₹200

 Paper Back

 400 Gm

 2

 2


मराठीत स्त्रियांच्या आत्मवृतांना एक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा उंचावणारे 'कुणास्तव कुणीतरी...' हे यशोदा पाडगावकर यांचे अविस्मरणीय आत्मवृत्त. सासवडमध्ये यशोदाबाईंचे वडील ख्रिस्ती धर्माचे मिशनरी होते. तिथल्या बालपणच्या सुखाच्या काळापासून हे आत्मवृत्त सुरु होते. एकाएकी हे सुखाचे दिवस संपतात. वडिलांचा अकस्मात मृत्यु होतो. कुटुंबाच्या प्रपंचाचे तारू हेलकावे खाऊ लागते... नियतीच्या चढ उतरातले अनुभव यशोदाबाईंचे संवेदनक्षम मन नोंदत राहते; नोकरी आणि मुलांचे संगोपन या उसाभरीत आईची होणारी त्रेधा, भावंडांचे व स्वताचे शाळा कॉलेजातले शिक्षण, मित्र-मैत्रिणी, शिक्षक वाढणारे वय, तऱ्हातऱ्हांच्या दृष्ट-सृष्ट व्यक्ती त्यांच्या अभिलाषा आणि सदिच्छा.... प्रतीवंत कवी म्हणून पुढे ख्यातनाम झालेल्या मंगेश पाडगावकरांवर जडलेली प्रीती. लग्नासाठी घरी झालेला तीव्र विरोध आणि तो निर्धाराने दूर ठेऊन लग्नात झालेली परिणती... एका धर्माच्या संस्कृतीतून दुसऱ्या धर्माच्या संस्कृतीतप्रवेश करत असताना आयुष्यभर करत राहावा लागलेला मानसिक संघर्ष... मिळालेले सन्मान आणि साहिलेल्या अवहेलना... अर्धशतकाहूनही अधिक काळ अनुभवलेल्या विशाल जीवनकलहाचे रम्यभीषण रूप यशोदाबाई इथे संवेदनशीलतेने, सहजपणे चित्रित करतात. त्यांच्या जीवनाविषयीच्या अनावर उत्सुकतेची,रसिक आणि आनंदी वृत्तीची, स्वभावातल्या त्रुजुतेची आणि शोशिकतेची साक्ष सतत मिळत राहते. संसारातल्या सुखदुःखाच्या छायांच्या पलीकडे जाऊन त्या त्यांचे स्वरूप अलिप्तपणे पाहताना दिसतात...जीवनाचे निखळ रूपच त्यांना पाहायचे आहे हे त्यांना जाणवते. हे रूप पाहत असताना, हरपत चाललेल्या श्रेयाचा झाकोळ त्यांच्या लेखनावर उतरत येतो. 'मी कशी जगत आले याविषयी मोकळेपणानं, अलिप्तपणान लिहावं एवढीच या लिहिण्यामागची उर्मी होती' असे यशोदाबाईंनी मनोगतात म्हटले आहे. त्याचा निर्भर प्रत्यय इथे येतो.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update