"एक स्त्री डॉक्टर जेव्हा फॅमिली डॉक्टर, म्हणून वैद्यकीय व्यवसाय करते व रुग्णांच्या तीन-तीन पिढ्या हाताखालून जाण्याचा प्रदीर्घ अनुभव तिच्या गाठीशी जमा होतो तेव्हा नकळत रुग्णांच्या वैयक्तिक जीवनाशी, सुखदुःखांशी ती किती समरस होऊन जाते याचे वर्णन लेखिका डॉक्टर सुषमा जावडेकर यांनी या पुस्तकात केले आहे. पुस्तकातील विविध कथांमधील काल्पनिक पात्रांच्या अनुशंगाने लेखिकेने अगदी जवळुन पाहिलेल्या विविध धार्मिक व आर्थिक स्तरांतील समाजजीवनाबद्दल व विशेषतः यातील भारतीय स्त्रीच्या स्थानाबद्दल अत्यंत कळकळीने लिहिले आहे. त्याच वेळी त्यांच्यातीलच एक होऊन लेखिका ते जीवन अक्षरशः जगली आहे हे ही प्रकर्षाने जाणवते.
आजच्या स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट यांच्या जमान्यात रुग्णावर उपचार करताना सहृदय 'फॅमिली डॉक्टर' ने रुग्णाच्या मानसिकतेचाही विचार करावा हे त्या अप्रत्यक्षपणे सुचवतात कारण रुग्णाला फक्त औषधाची गरज नसते तर मायेची फुंकर ही हवी असते.
लेखिकेचे अनुभव विलक्षण व विस्मयकारक तर आहेतच पण आठवणींचे हे अनमोल क्षण त्यांनी अतिशय समर्पक शब्दांत 'सोनेरी पाने' या पुस्तकामध्ये टिपले आहेत त्यामुळे पुस्तक रंजक वाटेल हे निश्चित !"
please login to review product
no review added