"दाजी पणशीकर
एक साधा पठडीतला,
रसाळ वक्तृत्वाचा आणि अभ्यासू वृत्तीचा सज्जन लेखक
पणशीकरांच्या घराण्यात व्यासंगांची परंपरा आहे. दाजींचे वैशिष्ट्य असे की, पुराणाकडे ते केवळ अंधश्रद्धेने पाहत नाहीत किंवा अनाठायी एकांतिका दुराभिमानानेही तर्काने अगदी पटण्यासारखे आहे व कालसरितेतून जे टिकणारे आहे तेवढ्याच आधारावर ते विसंबतात त्यामुळेच त्यांचे लेखन इतरांच्याहून अगदी निराळे, सखोल व शोधक बनले आहे.
कर्ण सूतपुत्र होता म्हणून, सत्य शोधण्याच्या नावाखाली त्याचे काही चुकीचे मूल्यमापन करण्याचे, तथाकथित पुरोगामी प्रयत्न चालू आहेत. त्यात केवळ सत्याचाच विपर्यास होतो असेच नाही तर नव्याने महाभारतकालीन व्यक्ती समजून घेण्याचा
चुकीच्या दिशेने प्रयत्न होतो आहे. महाभारतात अनेक श्रेष्ठ पुरुषांचे जन्म वादग्रस्त आहेत. त्यामुळे कर्णाचा जन्म वेगळ्या तऱ्हेने विचारात घेण्याचे
मुळीच कारण नाही.
कर्णाबाबत ही चूक पुष्कळजण करीत आहेत.
दाजी पणशीकरांचा हा ग्रंथ म्हणूनच
कर्णाकडे पाहण्याचा एक शुद्ध दृष्टिकोन होय. कर्ण हा महाभारतातील वादग्रस्त पुरुष आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत.
कर्ण खरा कोण होता ?
हे खरे पाहता,
पारंपरिक कल्पनांना फारसा धक्का न लावता केलेले बिनतोड असे विवेचन आहे."
please login to review product
no review added