कितीही विषयांवर लिहिलं गेलं, लिहिलं जात असलं, तरीही काही विषय आशय हे परिघाच्या बाहेर राहतातच. वाचकांच्या दृष्टीनं ते दूर राहतात... अज्ञात राहतात.... जगण्यात येणाऱ्या विविध विषयांवरच्या या वेगळ्या कथा वाचकांचं अज्ञातपण खऱ्या अर्थानं दूर करणाऱ्या आहेत. वाचकांच्या आसपास वावरणाऱ्या पात्रांना कथारूपात बंदिस्त करणं आणि शब्दांच्या गुंफणीतून ही पात्रं वाचकांसमोर जिवंत रूपात साकारणं, हे छाया महाजन यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य आणखी ठळक, अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत.
please login to review product
no review added