बाबुराव बागुलांनी उपेक्षितांचे, पीडितांचे जीवन अधिक आक्रमकपणे आणि भेदकपणे मांडले. काव्यात्मता त्यासोबत होतीच. माणसातील हिंस्रता, मानसिक कोंडी, भीषणता, अगतिकता, जातीयता, पशुत्व, विकारवशता, लढाऊपणा, संघर्षशीलता अतिशय प्रभावीपणे टिपली. त्यांच्या स्वतंत्र शैलीने वाचक आकर्षित झाला. त्यांचे नायक पुष्कळदा जीवनावर, जगण्यावर, वास्तवावर, स्थितीवर भाष्य करतात, विचार प्रकट करीत राहतात. आत्ममुक्तीची भाषा बोलतात. लेखिका म्हणते की ही भाषा आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब असते. एवढे निश्चित की, बागुलांची माणसे संघर्षाचा सूर्य झेलणारी आहेत. मग तो संघर्ष कामगारांचा असो की, दलितांच्या आत्ममुक्तीचा. डॉ. मालती इंगळे त्यांचे विश्लेषण समुचित आणि मार्मिकपणे करतात.
please login to review product
no review added