मी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत होतो; पण ते जमत नव्हतं आणि मग तर मला तिथे बसवेनाच. देवाचा चेहरा पाहता पाहता बदलला... डोळ्यांतले स्निग्ध भाव गेले आणि तिथे एक छद्मी क्रौर्य आलं. मिटलेले ओठ उघडले आणि तोंड एका विकट हास्यात उघडलं. तो चेहरा एकदम विक्राळ, भेसूर असा दिसायला लागला. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि गाभाऱ्याबाहेर पडलो. एकाएकी त्याचे विचार गोठले, हालचाल थांबली. त्याच्या आसपास आवाज नव्हता; पण हालचाल होती. मागे, डावीकडे, उजवीकडे सर्वत्र झाडं-झुडपं एखाद्या रंगवलेल्या पडद्यासारखी थरथरली. त्यांच्यातून काहीतरी सरकत होतं- सपाट्याने, आवाज न करता-धुरासारखं, सावलीसारखं. ते आले होते. त्यांचा सर्व धगधगता निर्यास आत घेऊन थंड, दगडी पुतळ्यासारखे ते आले होते आणि आता झाडाझुडपांतून हलकेच वरवर चालले होते. क्षणमात्र सवयीने, कुतूहलाने आले होते आणि आता चालले होते.
please login to review product
no review added