‘कोसला’ वयाच्या अठराव्या वर्षी भेटली. कादंबरीला आता पन्नास वर्षे झाली. पूर्वी वाचलेले कित्येक लेखक वाढत्या वयाबरोबर आणि काळ परिस्थिती बदलल्यावर मागे पडले. आवडेनासे झाले तसं ‘कोसला’ चं झाल नाही अभिजातपणाचा हा एक पैलू असावा. जगण्याच्या या पन्नास वर्षाच्या ओघात कायम ती जवळ राहिली. आयुष्यातल्या सगळ्या बर्या-वाईट प्रसंगात पांडुरंगाचा हुंकार ऎकू येत राहिला. एखादं पुस्तक असं संपूर्ण व्यापून राहावं ही आश्चर्याचीच बाब आहे. आता तर माझी खात्रीच झाली आहे की जग सोडताना मला ‘कोसला’ आठवेल.
please login to review product
no review added