तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्षाचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का’ या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या – तारा, जन्मापासून बंडखोर असते. तारा म्हणजेच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का आपल्या भोवतालच्या आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते.
please login to review product
no review added