कुणी मैत्रीण म्हणाली, 'अग, शिक्षणाने, वृत्तीने, ज्ञानाने, कृतीकर्माने तुम्ही दोघंही पंडितच. तुमचं प्रेम जमण स्वाभाविकच !'मी काहीच बोलले नाही त्यावर! जन्माने मी शहाण्णव कुळी मराठा, ते दलित. मी तिशीतली, देखणी; ते विवाहित, संसारी, रांगडे. मी विध्यार्थिनी, ते प्राध्यापक. प्रेमाचा साक्षात्कार प्रेमिकांच्या काळजाला होत असतो, मेंदूला नाही. त्या प्रेमाचा स्वीकार-धिक्कार करण्याचा हक्क जग बजावत, ते व्यवहारी मेंदूने; काळजाने नाही. हे सार मी मैत्रिणीला सांगितलं नाही कुमारी नंदा बाजीराव मांढेरची सौभाग्यवती नंदा केशव मेश्राम काशी झाले, का झाले आणि नंतर जगनिंदेचे, जनरोषांचे जीवघेणे आघात कशी सोसत आले, त्या बिकट यात्रेची ही कहाणी. आता केशव मेश्राम नाहीत, पण आघात जिवंत आहेत आणि "अमर प्रेम' अमर यातना" हे नव समीकरण मी क्षणोक्षणी अनुभवते आहे; त्याचीही कहाणी! ....मी नंदा!
please login to review product