या कादंबरीला अनेक आरंभ आहेत पण शेवट नाही. 'कथांतर्गत कथा' अशी रचना असलेल्या या कादंबरीत डाय-या आहेत, पत्र आहेत, पटकथाही आहे. कादंबरीतले दिपूशेठ, कोणकेरी , आडव्याप्पा हि सगळीच पात्रं आपापल्या भोवतालचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. झपाट्याने नगर होत चाललेल्या ग्रामीण- बहुजन समजाविषयीचा, त्यातल्या व्यक्ती आणि कुटुंबाविषयीचा हा गुंता आहे. नागरीकरणाच्या वामानी पावलाने समाजाच्या तळाशी गाडल्या गेलेल्या शेतक-याच्या जीवनाविषयीचा हा गुंता आहे. वाजत गाजत सुरू असलेल्या नागरीकरणाची नेमकी दिशा कोणती? ती आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? या नागरीकरणाची मूल्यव्यवस्था कोणती? त्यातून कोणाचं हित जपलं जात आहे? अशा कळीच्या प्रश्नांचा गुंताळा आहे.
please login to review product
no review added