• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Bhukeli Ratra (भुकेली रात्र)

  Saket Prakashan

 104

 

 ₹100

 Paper Back

 113 Gm

 1

 Out Of Stock


त्यांना स्वत:ला आता स्वत:चं ते दुसरं रूप दिसलं. गणपतराव विस्फारल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहत होते आणि मग त्यांनी आपल्या थकलेल्या शरीराने उठून बसण्याची एक क्षीण, केविलवाणी धडपड केली. लाल अंगरख्यातला आकार दात विचकून हसत हसत पुढे सरकत होता, कॉटवर वाकत होता. गणपतरावांच्या तोंडून एक अर्धवट गुदमरल्यासारखा आवाज आला आणि त्यांचा चेहरा रमाबाईंकडे वळला. चेहरा पांढर पडला होता. डोळे वटारले होते, घसा आवळला होता; काहीतरी बोलण्याची त्यांची निष्फळ धडपड चालली होती. तो एक क्षण ते दोन्ही चेहरे रमाबाईंकडे पाहत होते. एक भेदरलेला, पांढराफेक, काहीतरी बोलण्याची धडपड करणारा; दुसरा विचकलेल्या दातांचा, क्रूर, दुष्ट, मत्सराने भरलेला... आणि मग गणपतराव किंचाळले रमा!... मी... मी... मी... वळून ते एकदम वेडेवाकडे पडले. तोंड उघडं होतं. वटारलेले डोळे छतावर खिळले होते. छातीची हालचाल शेवटी थांबली होती. आणि मग ते दुसरे गणपतराव कॉटला वळसा घालून सावकाश त्यांच्या दिशेने यायला लागले. डोळे आता एका सैतानी विजयाच्या धुंदीत पेटून उठले होते. रमाबाई जगाच्या हलल्याही नाहीत. त्यांच्या मनात भीती, आशा या भावनांना जागाच नव्हती. त्या शेवटच्या काही क्षणांत आता काय होणार आहे याची पुरेपूर कल्पना त्यांना आली होती; पण आता सर्व भावना थिजल्या होत्या. त्यालाच काय, कशालाच काही महत्त्व नव्हतं.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update